डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक त्यांच्या स्वतःच्याच जीवनकार्याला हे अष्टक तंतोतंत लागू पडते. खरोखरच, डॉक्टरांसारखा संघटक, महापुरुष क्षणाक्षणाला जन्माला येत नाही. आपल्या राष्ट्राचं भाग्य थोर म्हणूनच डॉक्टरांसारख्या विभूतिमत्त्वाचा या देशात जन्म झाला. संघ समजून घ्यायचा असेल तर आधी डॉक्टरांचे चरित्र अभ्यासायला हवे. कारण डॉक्टर त्यांच्या कार्याशी इतके एकरूप झाले होते की, त्यांचा जीवनपट म्हणजे संघाचा इतिहासच आहे. काही वर्षांपूर्वी तृतीय शिक्षा वर्गात प्रबंधक असतांना केशवाष्टक सर्वप्रथम ऐकले. केरळ मधील सर्व स्वयंसेवक पहाटे एकत्रित यायचे आणि याचे सामूहिक पठण करत असत. हे अष्टक प्रत्येक स्वयंसेवकाला स्फूर्ती आणि नवचैतन्य देणारे आहे.
हिन्दुर्विशाल गुणसिन्धुरपीहलोके
बिन्दूयते विघटितो न करोति किञ्चित्
सत् संहतिं घटयितुं जननं यदीयम्
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।।१।।
हिंदूंच्या विशाल गुणरूपी सागराला जो या जगात बिंदूंप्रमाणे जोडतो आणि किंचितही विघटन करत नाही, सज्जनांचे संघटन करण्यासाठी ज्यांचा जन्म आहे त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो ।।१।।
भव्यं वपु: स्मितमुदारमुदग्रमोज:
सस्नेह गद्गदवचो मधुरं हितञ्च
वात्सल्यपूर्णममलं हृदयं यदीयं
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।।२।।
भव्य शरीर, उदार स्मित, आत्यंतिक तेज; स्नेहपूर्ण, मधुर आणि हितकारक वाणी, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ हृदय ज्यांचे आहे
त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो. ।। २ ।।
सङघे कलौभवतिशक्तिरिति: प्रसिद्धं
जानाति हिन्दुजनता न तु तत्कथञ्चित्
सम्यग्विनेतुमिहतद्धृतवान् वपुर्य:
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।। ३ ।।
कलियुगात संघटन शक्ती आहे, हे प्रसिद्ध आहे ते हिंदू लोकांना कसे बरे माहीत नाही? त्याचे योग्यप्रकारे समूदेशन करण्यासाठी ज्यांनी शरीर धारण केले. त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो....।। ३ ।।
क्षुद्रं न किञ्चिदिहनानुपयोगि किञ्चित्
सर्वं हि सङ्घहितमत्र भवेत्फलाय
इत्थं जनं विनयतिस्म निरन्तरं य:
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।। ४ ।।
इथे कुणीही शूद्र नाही, कुणीही निरुपयोगी नाही,इथे सर्वच संघाच्या उपयोगाचे आणि फलदायी होईल असे ज्यांनी लोकांना नेहमी शिकवले असे त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो.।४।।
आर्यक्षितेरिहसमुद्धरणाय दास्यात्
दास्यामि देहमिहसङघटनां विधातुं
निश्चित्यभीष्ममचरत् सततं व्रतं य:
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि।। ५ ।।
आर्यभूमीचा पारतंत्र्यातून उद्धार करण्यासाठी मी हा देह संघटन करण्याकरिता अर्पण करेन असा निश्चय करून ज्यांनी भीष्मव्रताचे आचरण केले त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो....।। ५ ।।
यो डॉक्टरेति भिषजां पदमादधानो
विज्ञातवान् भरतभूमि रुजां निदानम्
सङघौषधं समुदपादिनवञ्चयेन
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि।। ६ ।।
जे 'डॉक्टर' अशी वैद्यक पदवी धारण करणारे होते, त्यांनी भरतभूमीच्या वेदनेचे निदान जाणले (आणि) संघरुपी औषध निर्माण केले व योजले त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो....।। ६ ।।
एको बहु किल भवेयमितिश्वरेच्छा:
सेवाभवत्सततमेव परायदन्त:
एकश्चयो विहितवानिहसङ्घसर्गम्
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।। ७ ।।
'एक असून अनेक होईन' ही ईश्वराची इच्छा आहे. शेवटपर्यंत लोकांची सेवा घडावी हा एक निश्चय करून संघ निर्मिती केली त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो....।। ७ ।।
एषं हि कार्यमिदमित्यवगत्य सम्यक्
सङ्घक्रतो घृतमिवात्पयदायुराज्यम्
यो जीर्णदेहमजहान्नवताम् समेतुम्
तं केशवं मुहुरहं मनसा स्मरामि ।। ८ ।।
'हेच कार्य आहे' असे चांगल्या प्रकारे ओळखून संघरुपी यज्ञामध्ये तुपाप्रमाणे ज्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली ज्यांनी जीर्ण झालेल्या देहाचा त्याग नवीन देहप्राप्ती करता केला. त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो....।। ८ ।।
अष्टकं केशवस्येदं प्रातर्नित्यं पठन्ति ये।
सङ्घकार्ये न काठिण्यं तेषां भवति कर्हिचित् ॥
हे केशवाचे अष्टक रोज सकाळी जे पठण करतात त्यांना संघकार्यात कधीही काठीणता येत नाही.
संकलक - सर्वेश फडणवीस
संदर्भ - युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार-सांस्कृतिक वार्तापत्र, गीतगंगा, डॉ. हेडगेवार ( सचित्र चरित्र)
No comments:
Post a Comment