अंशु जम्सेंपा. ४१ वर्षीय अरुणाचल प्रदेशातील बोंबडीला भागातील गिर्यारोहण करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. सलग पाच दिवसात दोनदा एव्हरेस्ट सर करण्याचा मान त्यांच्या नावे आहे. अंशु जम्सेंपा
नॉर्थ-ईस्ट टुरिझम च्या ब्रँड अँबेसेडर आहेत. आजवर अंशु जम्सेंपा ह्यांनी पाच वेळा एव्हरेस्ट वर चढाई केली आहे. ह्यावर्षी अद्वितीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने अलंकृत झाल्या आहेत.
जर आपला प्रचंड आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे अंशु जम्सेंपा. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी एखादा डोंगरावर चढावे,एखादे शिखर सर करावे हे वाटत असतेच. जणूकाही आपल्याला खूप मोठं बक्षिसं मिळाल्याचा आनंद त्यातून मिळतो. अंशु जम्सेंपा ह्यांनी २०१७ मधील मे महिन्यात सलग १६ मे आणि २१ मे ह्या दोन दिवशी माऊंट एव्हरेस्ट सर केला होता. ८८४८ मीटर म्हणजे (२९,०२८ feet) अंतर त्यांनी पार केले आहे. आज एव्हरेस्टमधील सर्वात वेगवान डबल क्लाइंबिंग करण्याचा बहुमान त्यांच्या नावाने आहे.
१६ मे रोजी इतर १७ गिर्यारोहकांसह अंशु जम्सेंपा एव्हरेस्टच्या शिखरावर चढून सकाळी ९.१५ वाजता त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज फडकला. पुन्हा १९ मे रोजी नेपाळी गिर्यारोहक फूरी शेर्पाबरोबर त्यांची दुसरी चढाई सुरू झाली जवळजवळ कुठेही न थांबता त्यांनी गिर्यारोहण सुरू ठेवले. शिखर दरवाढीच्या अगोदर थोड्या थोड्या वेळ त्यांनी विश्रांती घेतली आणि शेवटी २१ मे रोजी सकाळी ७.४५ वाजता जेनिथ गाठली. मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांना ११८ तास ३० मिनिटे लागली.
२००९ पासून अंशु जम्सेंपा ह्यांच्या गिर्यारोहण प्रयत्नांना सुरुवात झाली. त्यांनी बर्याच रॉक क्लाइंबिंग आणि साहसी खेळांमध्ये सहभाग नोंदवला आहे. अरुणाचल माऊंटिनेरिंग आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्स असोसिएशन मधून गिर्यारोहक म्हणून सुरुवात केली आणि
ह्यासाठी घरच्यांनी कायमच प्रोत्साहित केले. एकदा सुरुवात केल्यावर मागे वळून पाहण्याची त्यांच्यावर कधीही वेळ आली नाही. प्रशिक्षण कोर्सच्या वेळी जाणवले की डोंगरात उभे राहायला आवडतं आणि कुठेतरी माउंट एव्हरेस्टला भेटायचे विचार त्यातून पुढे आले. पहिल्यांदा ही भावना फारच जबरदस्त होती. त्यासाठी त्यांनी सर्वप्रकारचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. माऊंट एवरेस्ट चढाई करण्याच्या आधी त्यांनी इतर लहानमोठ्या शिखरांवर चढाई केली कारण त्यांना जाण होती मोठ्या गोष्टीसाठी स्वतःला तयार करण्यासाठी हे करावे लागणार होतेच. हा प्रवास ही शून्यातून सुरू झाला आहे. लहानपणी लवकर लग्न झाल्याने आणि अत्यंत गरीब परिस्थितीत असतांना प्रसंगी जमीन विकून त्यांनी गिर्यारोहक म्हणून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे.
आज अरुणाचल प्रदेश सारख्या दुर्गम आणि सुदूर भागातील असून सुद्धा जिद्द आणि काही करण्याची उमेद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि गिर्यारोहक म्हणून वेगळी वाट त्यांनी निवडली. त्यांच्या पराक्रमाची ओळख पटवून देत केंद्र सरकारने यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत.
✍️ सर्वेश फडणवीस
#पद्म_गौरव #padmashri #anshu_jamsenpa
#prideofsport #prideofarunachalpradesh #PeoplesPadma
सुंदर माहिती
ReplyDelete